व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या काही खास फीचर्सबाबत जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या काही खास फीचर्सबाबत जाणून घ्या whatsapp

व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या प्लॅटफॉर्मचं एक वेब-फ्रेंडली व्हर्जन 2015 मध्ये लाँच केलं होतं. व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या मदतीने युजर्स डेस्कटॉपवर मेसेजिंग सर्व्हिसचा वापर करू शकतात. अनेक खास फीचर्स देण्यात आले आहे. मात्र अनेकांना याबाबत माहिती नाही. अशाच काही खास फीचर्सबाबत जाणून घेऊया.

वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ

गुगल क्रोममध्ये व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करत असाल तर एकाच वेळी दोन अकाऊंट सुरू करण्याचा पर्याय मिळतो. एक अकाऊंट युजर्स नॉर्मल मोडमध्ये सुरू करू शकतात. तर दुसरं अकाऊंट क्रोमच्या इनकॉग्निटो मोडमध्ये सुरू करता येते. व्हॉट्सअ‍ॅप वेबवर नवीन इमोजी आयकॉन टेक्स्ट बारच्या बाजूला मिळतो. तसेच इमोजी ट्रे ओपन न करता इमोजीसाठी एक शॉर्टकटही आहे. यासाठी फक्त कॉलन लावून इमोजीचे पहिले लेटर टाईप करावे लागेल. व्हॉट्सअ‍ॅप वेबवर येणारे व्हिडीओ पाहण्यासाठी एक मोठी विंडो ओपन होते. ज्यामध्ये तो व्हिडीओ प्ले होतो. मात्र हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप वेबवर येणारे व्हिडीओ हे एका वेगळ्या बॉक्समध्ये प्ले होतात. ज्यामुळे व्हिडीओ पाहत चॅट देखील करता येते.

साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे. कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. कॉलिंगला महत्त्व देणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. या फीचरच्या मदतीने वेटिंग कॉल कट करण्याची तसेच सुरू असलेला कॉल थांबवून नवा कॉल रिसीव्ह करता येणार आहे.