ब्राऊन तांदळाने वाढते रोगप्रतिकार शक्ती, जाणून घ्या

तुम्हाला भात मनापासून आवडत असेल, पण वजन वाढेल या भीतीने तुम्ही तुमच्या आवडत्या अन्नपदार्थापासून लांब राहत असाल, तर आता तुम्हाला तुमचा मोह आवरण्याची जरा सुद्धा गरज नाही. तुम्ही तुमच्या आहारामध्ये ब्राऊन राईस समाविष्ट करा आणि वजन वाढेल याची काळजी न करता भाताचे सेवन करा. ब्राऊन राईस म्हणजे नक्की काय, तर पॉलिश न केलेल्या, अन-रिफाइन्ड तांदुळाला ब्राऊन राईस असे म्हटले जाते. तांदुळाच्या दाण्याला सालीची दोन ते तीन आवरणे असतात.

ब्राऊन राईस तयार करण्यासाठी तान्दुळावरील केवळ सर्वात बाहेरची, जाडसर असलेली साल काढली जाते. बाकीच्या पातळ साली तांदुळावर तश्याच ठेवल्या जातात, म्हणूनच हा तांदूळ दिसायला ‘ ब्राऊन ‘, म्हणजेच भुरकट रंगाचा दिसतो. पांढरा तांदूळ तयार होताना त्यावरील सर्वच सालींची आवरणे काढून टाकली जातात, त्यामुळे तो तांदूळ शुभ्र पांढरा दिसतो. पण पांढऱ्या तान्दुळामध्ये केवळ स्टार्च असतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयोगी –

ब्राऊन राईसमध्ये(तांदूळ) अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि शक्तिशाली वनस्पती संयुगे असतात जी रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यास समर्थन देतात. याव्यतिरिक्त तांदळामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीरात खराब होणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करतात. ब्राऊन  तांदूळ साधारणपणे सुरक्षित मानला जातो. सामान्य आणि मध्यम रोज आहारातील वापरामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही.

फायदे –

  • ऊन तांदळामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. या शक्तिशाली संयुगे, फायबर व्यतिरिक्त, कोलन आणि स्तनाच्या कर्करोगासह विविध प्रकारचे कर्करोग रोखण्यासाठी मदत मिळते. संशोधनात असे आढळले आहे की आंबलेल्या ब्राऊन तांदूळ आणि तांदळाच्या कोंडाने  ट्यूमरच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत केली आणि प्रोस्टेट कर्करोग रोखण्यास मदत मिळते.
  • दम्याची अलर्जी दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, ब्राऊन तांदूळ आपण खाल्ल्यास दम्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. हृदयनिरोगी ठेवण्यास ब्राऊन तांदूळ खाणे फार उपयोगी आहे. ब्राऊन तांदळामध्ये आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या १२ % मॅग्नेशियमचे प्रमाण रहते. हे खनिज रक्तदाब नियमित करून आपल्या शरीरात सोडियम ऑफसेट करून आपल्या हृदयाला फायदा करते.

महत्वाच्या बातम्या –