जाणून घ्या थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे फायदे

जाणून घ्या थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे फायदे orange

संत्र हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

नाशिकमध्ये उन्हाळ कांदा लागवडींना वेग

वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो.थंडीत नियमितपणे संत्र खाणं तुम्हाला निरोगी ठेवतं.त्यामुळे त्वचेवर आर्द्रता आणि ओलावा राहतो.आपले दात आणि शरीरातली हाडं बळकट ठेवण्यासाठी त्यातलं कॅल्शियम मदत करते.त्यामुळे त्याचा वापर च्युईंगममध्ये केला जातोत्यातल्या व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

तसेच कॅन्सर आणि ह्रदयरोगाला लांब ठेवते.संत्र्यातील गुणधर्मामुळे किडनी स्टोन होण्याचं प्रमाण कमी होतं,असंही एक निरीक्षण आहे.संत्र्याला स्वत:चा एक छान सुवास असतो,त्यामुळे अत्तरांमध्ये त्याचा समावेश केला जातो.संत्र्यातील सगळ्या गुणधर्मांमुळे अनेक औषधं आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये संत्री वापरली जातात.