जाणून घ्या तीळ गुळाच्या लाडूचे फायदे…

संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. यापार्श्‍वभूमीवर तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण पाहिले.आजारासाठी विशिष्ट तपासण्या, नियमित औषधे, तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला हे तर महत्त्वाचे आहेच. पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्‍यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल, असा मला विश्‍वास आहे.

हिवाळ्यामध्ये गरमऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करा

-सांधेदुखीसाठी तिळाचेतेल गरम करावे आणि या गरम तेलाने कंबर, सांधे सर्वांना अभ्यंग करून शेकावे. त्यामुळे दुखणे कमी होण्यास मदत होते.

-लहान मुलांना काहीवेळा अपचन होऊन पोट दुखते. अशा वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार तिळतेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे. दुखणे लवकर कमी होते.

-बाळंतिणीला तिळाचे तेल अंगाला लावण्याची पद्धत आहे. तिळ मातेचे दूध वाढवतात म्हणून बाळंतिणीला तिळाचा लाडू, भाजलेले तीळ देण्याची प्रथा आहे.

-आपण स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी पांढरे तीळ आणतो. औषधामध्ये मात्र काळे तीळ वापरावेत.

अळूची पाने खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

-रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात.

-बाळंतशेपा, ओवा, भाजलेले तीळ, सैंधव, बडीशेप एकत्र करून बाळंतिणीला दिल्यास वाताच्या तक्रारी, गॅसेस होणे, पचन न होणे या सर्वांस आराम मिळतो.

-मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असल्यास लोणी-खडीसाखर, नागकेशर यांच्यासमवेत तीळ सेवन केल्यास चांगला परिणाम होतो.