‘अंजीर’ खाण्याचे रहस्यमय फायदे, जाणून घ्या

ड्रायफ्रूट खाण्याचे भरपूर फायदे असतात. हे आपण नेहमीच ऐकत असतो आणि वाचत असतो. पण असं एक फळ तुम्हाला माहिती आहे का जे तुम्ही फळ म्हणूनही खाऊ शकता आणि तेच फळ वाळलं की त्याच रूपांतर ड्राय फ्रूटमध्ये होतं. ते फळ आहे ‘अंजीर’. अंजीर हे फळ खूप कमी लोकांनी बघितलं असेल. मात्र ड्रायफ्रूट मधील अंजीर सर्वांना ठाऊक आहे. पण फक्त ड्रायफ्रूट अंजीर नव्हे तर अंजीर फळ खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे.  चला तर जाणून घेऊयात अंजिराचे काही रहस्यमय फायदे.

सीताफळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

  • अंजीरमध्ये सोल्यूबल फायबरचे प्रमाण अधिक ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी मदत होते. तसंच फायबरमुळे पचन क्षमता वाढते आणि एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल शरीरातून नाहीसं होतं.
  • अंजीरमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांमुळे शरीरात कफ कमी होतो. याचसोबत दम्यापासून देखील अंजीर आपलं संरक्षण करतो.
  • जेंव्हा शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमी होते, तेंव्हा ऍनिमिया होतो. मात्र अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते त्यामुळे अंजीर ऍनिमिया कमी करण्यासाठी मदत करते.

सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

  • अंजीर खाल्ल्यामुळे हृदयाचे काम सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होते. तसंच शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सला संपवण्यासाठी अंजीरमध्ये आसलेले अँटिऑक्सिडंट मदत करतात. अंजीरमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड असतं ज्यामुळे हृदय सुरक्षित राहण्यास मदत होते.
  • अंजीरमध्ये असलेल्या एक तत्वामुळे शरीरात इंसुलिन निर्माण करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे डायबीटीज कंट्रोल करण्यात मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे