वाहतुकीच्या चांगल्या सुविधा असणारे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करू –अजित पवार

अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे शहरात सुरू असलेली विविध विकास कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. विकासाची कामे करताना नागरिकांच्या सुविधेचा प्राधान्याने विचार करावा. त्यांना  समस्या येणार नाहीत याकडेही लक्ष द्यावे. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या समन्वायातून ही कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारतर्फे करण्यात येणारे विकास प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी राज्याकडूनही पूर्ण सहकार्य करण्यात येईल.

विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन या कामांमध्ये अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. राज्य सरकार शहराच्या विकासासाठी सर्व ती मदत सतत करीत आहे. शहरांची लोकसंख्या व आकार वाढत आहे त्याप्रमाणे रस्ते व अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचेही लवकरच भुमिपूजन करण्यात येईल.

शहराची वाढती  लोकसंख्या विचारात घेता आणि वाहनांची संख्याही वाढताना तेवढ्या प्रमाणात वाहतुकीसाठी सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. पुण्याला जगातील आदर्श शहर बनविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. विकास कामांबाबत कुठलेही राजकारण न आणता नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देवून वाहतुकीच्या चांगल्या सोयीसुविधा असणारे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शहराचा शाश्वत विकास होण्याच्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. ज्या गतीने शहराची वाढ होत आहे त्या प्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. मुंबई- पुणे एक्सप्रेस वे मुळे अनेक पुणेकरांना याचा फायदा झालेला आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी  पुणे शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या –