fbpx

‘शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र फसवे’-शिवाजीराव आढळराव पाटील

टीम महाराष्ट्र देशा –  दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकरी आपल्या विविध ११ मागण्यांसाठी २ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर गेले असून आज या संपाचा तिसरा दिवस आहे. आज येथील संपकरी शेतकऱ्यांना शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव पाटील यांनी कानगाव येथे येऊन भेट दिली.

सरकारने अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले प्रमाणपत्र फसवे असल्याची टीका यावेळी पाटील यांनी केली.मुख्यमंत्री शेतकरी आणि कामगारांचा प्रश्न गांभिर्याने घेत नसल्याचेही शिवाजीराव पाटील यावेळी म्हणाले. शेतकरी आणि कामगारांनी मराठा मोर्चासारखी परिस्थिती येऊ देऊ नये. आंदोलनकर्त्यांनी मागण्यांची तड लागल्याशिवाय माघार घेऊ नये, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. शेतकरी आंदोलनाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करून योग्य प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले. संपकरी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आढळराव पाटील यांना सादर केले

Add Comment

Click here to post a comment