राज्यातील ‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये लेवल तीन चे निर्बंध कायम

राजेश टोपे

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. २०२० देशात शिरकाव केलेल्या रोगाने अक्षरशः थैमान घातले. दुसऱ्या लाटेत या रोगाची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसून आले. यामुळे आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली. तर, कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढण्यासोबतच मृत्यूचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे अनेक कुटुबांचा आधार गेला असून देशाची आर्थिक स्थिती देखील बिकट होत आहे.

देशात मुख्यतः महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसून आले. यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावण्यात आले. तर, सध्या निर्बंधांना शिथिलता देण्यात आली असून आणखी सूट मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली असून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये लेइ वल ३ चे म्हणजेच सध्या लागू असलेलेच निर्बंध कायम राहणार असून कोणतीही सूट देण्यात येणार नाही.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर; कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर; मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर मध्ये तिसऱ्या स्तराचे नियम लागू करण्यात आले आहेत.

काय आहेत लेवल ३ चे निर्बंध –

  •  सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.
  • रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार 50% बैठक क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी 4 वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.
  • उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.
  • सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 9 पर्यंत सुरू राहतील.
  • खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.
  • कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) 50% क्षमतेने सुरू राहतील.

क्रीडा, चित्रीकरण, समारंभ आणि अंत्यसंस्कार 

  •  क्रीडा- सकाळी 5 वा.पासून सकाळी 9 वा./ सायं 6 वा. पासून सायं.9 पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
  • चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
  • सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक 50% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • लग्न समारंभ फक्त 50 लोकांच्या मर्यादेतच करता येतील.
  • अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
  • बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या 50 टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.

बांधकाम, कृषी आणि इतर सेवा –

  • बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.
  • कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.
  • ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
  • जमावबंदी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.
  • व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.

वाहतूक आणि परिवहन सेवा –

  • सार्वजनिक परिवहन सेवा 100% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
  • मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे 3 ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
  • खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.

उत्पादनाच्या अनुषंगाने

  • उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.
  • अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)
  • सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)
  • राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
  • अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

महत्वाच्या बातम्या –