२४ ते ४८ तासांत विदर्भातील दक्षिणेकडील भागात हलक्या पावसाची शक्यता

पाऊस

विदर्भामध्ये मागील चोवीस तासात हलका पाऊस झाला आहे. ढगाळ परिस्थिती आणि त्यानंतरच्या पावसामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. तसेच दुसरीकडे कोकण आणि गोवा, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र कोरडेच राहिले.

दरम्यान वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्यामुले विदर्भातील दक्षिणेकडील भागातही पुढील १२ ते १८ तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याउलट, मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भाग आणि उर्वरित उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडेच असेल. त्याचप्रमाणे मुंबईत दिवस व रात्रीसह हवामान कोरडे राहील. दिवसाचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता असून तर किमान तापमान २० अंशांपेक्षा जास्त राहील.

कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी पाहायला मिळतील ; घ्या जाणून …..

चक्रवाती परिभ्रमण मराठवाडा आणि लगतच्या भागावर आहे. यामुळे मराठवाडा आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात पुढील ४८ तासांत हलक्या सरी आणि गडगडाटी परिस्थिती अनुभवली जाण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात हवामान कोरडे राहील. कमाल तापमान २९ अंशांच्या आसपास तर किमान १६ अंशांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

source – skymetweather

महत्वाच्या बातम्या –

आता कृषिमंत्री जाणार दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या शेतावर

मोहराला अनुकूल वातावरण नसल्याने हापूसचा हंगाम दीड महिने लांबला

मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर  ७०.८४ टक्‍क्‍यांवर

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही