पंजाब – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबामध्ये काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली खेती बचाओ यात्रा सोमवारी संगरूर जिल्ह्यात पोहोचली.
भवानीगड येथे धान्यबाजारात झालेल्या सभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषि विधेयकाकरून मोदी सरकारवर निशाणा साधला.मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी एकही धोरण आणले नाही. ती सर्व धोरणे तीन ते चार निवडक मित्रांसाठी (उद्योगपती) बनवण्यात आली, असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी या यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारवर हल्ला चढवत आहेत तर काँग्रेसच्या या रॅलीत शेतकऱ्यांच्या उपस्थितीबद्दल अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आली. यावरूनच भाजपा खासदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं.
राहुल गांधींच्या 'शेती वाचवा' आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब! https://t.co/BBhq4Z0rxe
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 6, 2020
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब!असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- काळ्या मानेपासून ५ मिनिटात मिळवा मुक्तता, जाणून घ्या घरगुती उपाय….
- उकडलेले अंडे खाणार्या ९९% लोकांना माहित नाही ही गोष्ट, जाणून घ्या
- राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- ‘बागायतदार शेतकऱ्यांना ५० हजार प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हजार प्रति हेक्टरी मदत करा’