आमदार महेश लांडगे यांच्या कडून पूरग्रस्तांसाठी पशुधनाची मदत

पशुधन

कोल्हापूरच्या लाल मातीशी असलेल्या पैलवानकीच्या ऋणातून पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी पूरग्रस्त कोल्हापूर व सांगलीला शहरातून सर्वाधिक मदत दिली आहे. महापूरातील उध्वस्त कुटुंबे सावरावीत यासाठी आता ते त्यांना पशुधन व त्यातही जर्सी गाई देणार आहेत.

या गायी खऱ्या गरजवंताना दिल्या जाणार आहे. त्याची खात्री कोल्हापूर व सांगली येथील पशुधन अधिकाऱ्यांचे मृत गाई, म्हशी, बैलांचे पंचनामे व सबंधित कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पशुधन देण्याची तयारी दाखविलेल्यांकडून त्यापोटी पैसे घेऊन ते देऊन गुजरातहून या दुभत्या गाई आणल्या जाणार आहेत. दानशूरांकडून प्रत्यक्ष गाई व म्हशींची मदतही ती रवाना करण्याच्या आदल्या दिवशी स्वीकारली जाणार आहे. त्यामुळे त्यांना सांभाळण्याचा प्रश्न उभा राहणार नसल्याचे सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –

पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी ; दहा हजार लोकांचे स्थलांतर

महापुरामुळे सांगलीत विक्रीसाठी आलेल्या शेतीमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान ; बाजारपेठ उध्वस्त

जायकवाडी धरणाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु; नदी काठच्या गावांना दक्षतेचा ईशारा