राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन हटवता येणार नाही – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. दोन महिन्यात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून १ तारखेपासून दुकान उघडणारच असा निर्धार अनेक संघटनांनी केला आहे. यामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. आवाज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यामध्ये कोरोना स्थिती व इतर मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील सरसकट लॉकडाऊन हटणार नाही असं भाष्य केलं आहे. ‘२१ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रेट आहे. त्यामुळे पूर्णपणे लॉकडाऊन हटवता येणार नाही. लॉकडाऊन हा वाढवण्यात येणार असून काही बाबतीत शिथिलता देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, कोणकोणत्या गोष्टींना सूट द्यायची यावर मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात याबाबत नियमावली तयार केली जाईल. तर सूट असलेल्या वेळेत काही प्रमाणात वाढ करण्यात येऊ शकते, असं भाष्य राजेश टोपे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –