राज्यातील लॉकडाऊन पुन्हा १ जूननंतर वाढणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद

उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं होतं. मात्र, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जूननंतर सरसकट लॉकडाऊन उठणार नाही, असं भाष्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील सरसकट लॉकडाऊन उठणार नसलं तरी नियमांमध्ये काहीशी शिथिलता देण्याची शक्यता देखील टोपेंनी वर्तवली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं आहे. राज्य सरकार ज्या नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा विचार करत आहे, ते सर्व जिल्ह्यांमध्ये लागू होणार की रुग्णांच्या आकडेवारीनुसार काही भागांमध्ये शिथिलता दिली जाणार हे महत्वाचं आहे. अशातच, आज रात्री ८.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय जाहीर करणार याकडं जनतेचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील कोरोना स्थिती कशी आहे ?

एप्रिल महिन्यात ऍक्टिव रुग्णांची संख्या ही सात लाखांपर गेली होती. आता, राज्यात सध्या २,७६,५७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, २१ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रेट आहे. त्यामुळे पूर्णपणे लॉकडाऊन हटवता येणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या –