लोणावळा शहरात गेल्या 24 तासात तब्बल 384 मिमी पावसाची नाेंद ; इंद्रायणीनगरला पुराचा धोका

इंद्रायणीनगरला पुराचा धोका

लोणावळा शहरात गत 24 तासात तब्बल 384 मिमी पावसाची नाेंद झाली आहे. लोणावळा शहरातील टाटा कंपनीचे धरण पहाटे साडेपाच वाजता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या  सांडव्यावरुन साधारण 2  क्युसेकने पाणी इंद्रायणी नदीपात्रात येऊ लागल्याने धरणालगत असलेल्या आयएनएस शिवाजीच्या नौसेना बाग ह्या रहिवासी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

दरम्यान नदीकाठावरील हुडको वसाहत व इंद्रायणीनगरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास इंद्रायणी नदीपात्रालगत असलेली हुडको वसाहत व इंद्रायणीनगर भागात पुराचे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हुडको भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्याबाबत तयारी सुरु करण्यात आली आहे.

Loading...

सदर ठिकाणी रोप बांधण्यात आले असून लोणावळा नगरपरिषदेची आपत्कालिन पथके, लोणावळा शहर पोलीस, टाटा कंपनीची पथके, शिवदुर्ग मित्र व आयएनएस शिवाजी यांची पथके हुडको येथे तैनात असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, पालघरसाठी अतिरिक्त सहा पथकांची एनडीआरएफकडे मागणी – मुख्यमंत्री

खडकवासला साखळीतील चारही धरणातील पाणीसाठा २५ अब्ज घन फुटांवर

Add Comment

Click here to post a comment
Loading…