ड्रायव्हिंग लायसन्स हरवलय ? ‘ह्या’ सोप्या पद्धतीने मिळेल घरबसल्या लायसन्स !

लायसन्स

भारतात तसेच जगात ड्रायव्हिंग लायसन्स(Driving license) हे वाहन चालवण्यासाठी महत्वाचे सरकारी दस्तावेज मानले जाते. ड्रायव्हिंग लायसन्स(Driving license) नसल्यास काय त्रास होतो हे सांगण्याची गरज नाही. अश्या वेळेस तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) हरवले असेल तर… तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही अथवा RTO कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स(Driving license) तुम्ही आता घरी बसून मिळवू शकता तेही काही मिनिटातच.
प्रथमतः तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असल्यास पोलिसात तक्रार नोंदविणे अत्यंत गरजचे आहे.

पुढीलप्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता –
१ ) परिवहन विभागाच्या(Department of Transportation)  https://morth.gov.in/ ह्या वेबसाईटवर जावा व दिलेल्या माहितीनुसार तपशील भरून घ्या.
२ ) त्यानंतर, LLD फॉर्म भरा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
३ ) तुम्हाला आता सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील अन्यथा तुम्ही कागदपत्रे फक्त आरटीओ कार्यालयात जमा हि करू शकता.
४ ) हि सर्व प्रोसेस झाली. त्यांनंतर ३० दिवसात तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हे तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.

ऑफलाईन पद्धतीने हि करू शकता अर्ज –
ज्या आरटीओ मधून तुम्हाला ओरिजनल (मूळ) ड्रायव्हिंग लायसन्स दिले होते तेथून तुम्ही LLD फॉर्म भरून सबमिट करावा. यासोबत काही शुल्क हि भरावे लागतील. ३० दिवसात तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स(Driving license) तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मिळेल.

महत्वाच्या बातम्या –