शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न-महादेव जानकर

नाशिक: पोल्ट्री उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून त्यामाध्यमातून राज्यात अंडी व ब्रायलरचे उत्पादन वाढवण्यासाठी शासन सर्व सुविधा देईल यासाठी पोल्ट्री उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे असे प्रतिपादन पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले. दोन दिवसीय इंडीया पोल्ट्री एक्सो 2018 च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री जानकर म्हणाले, राज्यात अंडी व चिकनची मागणीच्या प्रमाणात उत्पादन होत नाही त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून याची मागणी पूरवली जात आहे. उद्योगांसारखा रोजगार देण्याची क्षमता आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत असे ते म्हणाले.याप्रसंगी आमदार सीमा हिरे, डॉ. पेडगावकर, वसंतकुमार, शुक्ला व पवार यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी मंत्रमहोदयांनी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शन 27 ते 29 जानेवरी 2018 या कालावधीत ठक्कर डोम येथे सुरु राहणार असून पोल्ट्री उद्योगासाठी लागणारे फिड, पशूंची औषधे व शेड उभारणीसाठी लागणारे विविध साहित्य येथे उपलब्ध असून याबाबत मार्गदर्शन व चर्चासत्रे या दोन दिवसात होणार आहेत.