डिजिटल माध्यमांमध्ये ‘महाराष्ट्र देशा’चा डंका, फेसबुक एंगेजमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

टीम महाराष्ट्र देशा-  फेसबुक पेज रँकिंग आणि एंगेजमेंट मध्ये महाराष्ट्र देशा दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास यामुळेच हे शक्य झालं..! निर्भीड बातम्या आणि सडेतोड मुलाखतीमुळे महाराष्ट्र देशाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे

‘दर्पण’पासून सुरु झालेली मराठी वृत्तपत्रांची सुरुवात आज शकडो वृतापत्रांच्या स्वरूपामध्ये वाचकांपर्यंत देश विदेशातील ताज्या घडामोडी पोहचवण्याचे काम करतात. पुढे काळ बदलला तसे प्रसारमाध्यमांचे स्वरूपही बदलेले. आजची घटना उद्या वाचायला मिळण्याचे साधन असलेल्या वृतापत्रांना इलेक्ट्रॉनिक मिडीयाने एक मोठा पर्याय उभा केला. कारण इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून जे घडतय ते थेट व्हिडीओच्या स्वरूपातून नागरीकांपर्यंत पोहचू लागलं. काळ बदलला तसा मिडीयाच स्वरूप देखील बदलत जात आहे. आज २१ व्या शतकामध्ये वृतपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाला एक नवीन पर्याय उभा राहत आहे तो म्हणजे डिजिटल मिडीयाचा. याच आधुनिक युगातील थोड्याच काळात वाढत असलेले माध्यम म्हणजे ‘महाराष्ट्र देशा’. महाराष्ट्र देशा न्यूज हे आता 4 Pillar Publication Pvt Ltd कंपनीचा भाग आहे.

इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये काम करत असलेल्या अभिजित दराडे, दीपक पाठक, विरेश आंधळकर आणि मनोज जाधव या चार युवकांनी एकत्र येत प्रस्थापित मिडियाला एक नवीन पर्याय देण्यासाठी, सामन्यांचा, जागोजागी पिचल्या जाणाऱ्या गाव खेडी ते शहरातील नागरिकांचा आवाज म्हणून उभे राहण्यासाठी सुरुवात केली ती ‘महाराष्ट्र देशा’ची. संपूर्ण महाराष्ट्र हा एकसंध जातीजातीमध्ये असणारा बंदुभाव, महाराष्ट्राची अलौकिक परंपरा, छत्रपती शिवरायांचे सुराज्य आणि स्वराज्याचे स्वप्न, फुले- शाहू- आंबेडकरांचे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे व्रत आम्ही पुढे नेण्याची उर्मी बाळगतो म्हणूनच आमच्या कार्यांच नाव ‘महाराष्ट्र देशा’ हे निश्चित केले.

१६ जून २०१७ रोजी एका छोटेखाणी कार्यक्रमात ‘विशेष मुलांच्या’ हस्ते महाराष्ट्र देशा न्यूज वेबसाईटचे लाँचींग करण्यात आले. सुरुवात ते आजची परिस्थिती यामध्ये काळानुरूप बदल अंगीकारत आम्ही वाटचाल सुरु ठेवली आहे. अचूक विश्लेषण आणि निर्भीड बातम्यां, लेख यांच्यामुळे सुरुवातीला केवळ १०० वाचक संख्या असणाऱ्या आमच्या वेबसाईटला आज दिवसाला ३५ ते ५० हजारांच्यावर वाचक भेट देतात.

वृतपत्र असो कि इलेक्ट्रॉनिक मिडिया ते डिजिटल मिडीया प्रत्येकाला वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करावा लागतो, जस कि वृत्तपत्रांची स्टॉलवर आणि सबस्क्रायबरला विक्री तर इलेक्ट्रॉनिक मीडियाला वेगेवगळ्या डिश सुविधांमार्फत प्रत्येकाच्या घराघरात पोहचता येते. याच पद्धतीने डिजिटल मिडीयासाठी फेसबुक, व्हॉटसअप, ट्वीटर, न्यूज मोबाईल अॅप या सोशल मिडीयाद्वारे वाचकांपर्यंत पोहचता येते. आज महाराष्ट्र देशाच्या फेसबुक पेजला ३.२१ लाखांच्यावर लाईक आणि फॉलोअर आहेत. तर ट्विटर आणि इतर माध्यमातूनही बातम्या हजारो लोकांपर्यंत पोहचतात. अवघ्या काही महिन्यांमध्येच सोशल मिडीयामध्ये प्रस्थापित वृत्त वाहिन्या आणि वृतपत्रांच्या रांगेत आम्ही दुसऱ्या स्थानावर आहोत हि आमच्या स्वत:साठी अभिमानाची बाब आहे. तसेच वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास यामुळेच आम्ही हे शिखर गाठू शकलो. यासाठी वाचकांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.

येणाऱ्या काळात गाव खेड्यांसाठी ‘गावाकडच्या गप्पा’ ‘सरपंच लाइव्ह’ यासारखे ग्राउंड रीयालीटी दाखवणारा व्हिडीओ स्वरूपातील कार्यक्रम आम्ही सुरु करत आहोत. तसेच नागरिक आणि प्रशासनामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी ‘अधिकारी लाइव्ह’ लाखो नागरिकांच्या विकासाची जबाबदारी असणाऱ्या आमदारांचा ‘कामाचं बोला’ हा विशेष कार्यक्रमही लवकरच सुरु होत आहे.

Date- 10 May 2018, Source- Facebook फेसबुक पेज रँकिंग आणि एगेजमेंट. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास यामुळेच हे शक्य झालं. महाराष्ट्र देशा दुसऱ्या स्थानावर. खूप खूप धन्यवाद...! #महाराष्ट्रदेशा #MaharashtraDesha #MHD

या वाटचालीत आम्हाला अनेक जेष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन लाभले ज्यामध्ये जेष्ठ पत्रकार अभय निकाळजे, टेक्निकल सहाय्यक अमोलकुमार सुपे, ETV भारतचे राहुल वाघ, न्यूज 18 लोकमतचे जेष्ठ पत्रकार अद्वैत मेहता, झी 24 तास चे अरुण म्हेत्रे, ABP माझा चे मंदार गोंजारी, मिकी घई,TV 9 चे सागर आव्हाड, संतोष आदमने (Ain news) जय महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनीचे पत्रकार अमोल कविटकर , सचिन जाधव, सल्लागार मुकुल पोतदार, जेष्ठ पत्रकार भारत पाटील, देव शेजूळ सर, प्रा. तुषार डुकरे, अनुप सिन्हा, अक्षय वारे, निलेश रसाळ, प्रकाश बनकर, प्रा.प्रवीण कुंटे, CA विश्वनाथ जोशी, महास्पोर्टचे शरद बोदगे, थोडक्यातचे कृष्णा वरपे, पत्रकार सुदेश मिटकर, किरण शिंदे, हर्ष दुधे, सोमनाथ कड, माध्यम समन्वयक कुशल कोंडे, श्यामल खैरनार, अनुप गोरे, सागर बोदगिरे, रोहित भिसे,अॅॅड. भूषण राऊत, संजय एखंडे यासर्वांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले आहे.

याशिवाय आम्हाला हे यशाचे शिखर गाठताना मोलाची मदत ज्या प्रतिनिधींनी केली असे आमचे वेब एडिटर संदीप कापडे, ग्राफिक्स डिझायनर तन्मय एखंडे, प्रतिनिधी श्याम पाटील, गौरव मोरे, कोमल औताडे, मयुरी वाशिंबे, स्वप्नील भालेराव, भागवत दाभाडे,अक्षय पोकळे, भावना भाटीया संचेती, अजय देशपांडे, शिवानी ठाकरे, अतिश ढवळे, ज्ञानेश्वर राजुरे, मयूर तावाडे, अपूर्व कुलकर्णी, कृष्णा रामदासी, प्रमोद लांडे,संदेश कान्हू, शलाका मुंगी, सोपान रोडगे,निवृत्ती नवथर या आणि अश्या अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली.

महाराष्ट्र देशा च्या स्वतंत्र मोबाईल अॅप सह Daily hunt , Jio News Express, News Point, Public Vibe, News Plus तसेच News Dog या अग्रगंण्य अॅप वर महाराष्ट्र देशा वाचकांसाठी उपलब्ध आहे.

Facebook-  https://www.facebook.com/MahaDeshaa

Twitter-       https://twitter.com/Maha_Desha

Instagram- https://www.instagram.com/maha_desha/

Pintrest-     https://in.pinterest.com/maha_desha

YouTube-    https://www.youtube.com/c/MahaDesha?sub_confirmation=1