Maharashtra Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update | राज्यात आज 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात मंदोस चक्रीवादळ (Cyclone Mandous) सक्रिय झाल्यामुळे वातावरणामध्ये (Weather) सतत बदल होत आहे. अशा परिस्थितीत राज्यात (Maharashtra) काही ठिकाणी थंडीचा (Cold) कडाका जाणवत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम राज्यात होत आहे. अशात आज मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांना जिल्हा व्यवस्थापनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळामुळे मराठवाड्यातील औरंगाबादसह इतर जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर या चक्रीवादळामुळे हवामानात सातत्याने बदल बघायला मिळत आहे. अधून मधून ढगांची गर्दी होत असून मध्येच अतिथंडी जाणवत आहे. सोमवार ते बुधवार असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये वारे 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दिली आहे.

राज्यामध्ये आज पुणे, मुंबई आणि औरंगाबादसह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर, अनेक ठिकाणी गार वारा सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी जीवनावर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या वातावरणामुळे शेतकऱ्यांना देखील मोठ्या फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सध्याच्या हवामान परिस्थितीमध्ये दहा डिसेंबर पासून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील औरंगाबाद आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, औरंगाबाद आणि परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.

महत्वाच्या बातम्या