Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये (Maharashtra) वातावरणात (Weather) चांगलाच बदल होत आहे. ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. यामध्ये अहमदनगर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर, पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याचे चित्र दिसत आहे. या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. कारण या पावसामुळे हिवाळी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसामुळे शेतीतील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
राज्यात सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पंढरपूर तालुक्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला आहे. पंढरपूर सोबतच सांगोला, महूद, मंगळवेढा आणि माढा या परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची चिंता वाढलेली असून, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातही अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सांगलीमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील द्राक्षाचे पीक सध्या काढणीवर आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसामुळे द्राक्षावर बुरशीजन्य रोग पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील काल संध्याकाळी पावसाने धुमाकूळ घातला. अहमदनगरमधील कोपरगाव आणि राहता या तालुक्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Zika Virus | कर्नाटकमध्ये 5 वर्षाच्या मुलीला झिका व्हायरसची लागणं
- Uddhav Thackeray | नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा ठाकरे गटाकडून समाचार; म्हणाले, “इथली जनता त्यांचा माज…”
- Nitesh Rane | “माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर…”; नितेश राणेंची मतदारांना जाहीर धमकी
- Jayant Patil | राज्यपालांना ‘ते’ पत्र पाठवण्यासाठी इतके दिवस का लागले? – जयंत पाटील
- Pankaja Munde | गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंचं भाषण; म्हणाल्या, “महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्यांचं…”