Maharashtra Weather Update | विदर्भ थंडीने गारठला, तर मंदोस चक्रीवादळामुळे राज्यात ‘या’ ठिकाणी ढगाळ वातावरण

Maharashtra Weather Update | विदर्भ थंडीने गारठला, तर मंदोस चक्रीवादळामुळे राज्यात 'या' ठिकाणी ढगाळ वातावरण

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात मंदोस चक्रीवादळ (Cyclone Mandous) सक्रिय झाल्यामुळे वातावरणामध्ये (Weather) सतत बदल होत आहे. अशा परिस्थितीत राज्यात (Maharashtra) काही ठिकाणी थंडीचा (Cold) कडाका जाणवत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम राज्यात होत आहे. तर, विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याचे चित्र समोर आले आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 8.8 अंशावर गेला आहे. गोंदिया विदर्भातील सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. तर, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडी चांगलीच वाढली आहे. तर दुसरीकडे, मंदोस चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरही होऊ शकतो. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण आणि परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये अचानक दोन दिवसात तापमानात घसरण झाले आहे. गोंदियामध्ये सध्या तापमान 8.8 अंशावर पोहोचलं आहे. तर याआधी गोंदिया जिल्ह्यात तापमान 10.2 अंशावर होते. आज पुन्हा तापमानात घसरण झाल्यामुळे गोंदिया जिल्हा थंडीने हुडहुडला आहे. गोंदियामध्ये अचानक थंडीचा कहर वाढल्यामुळे जागोजागी लोक शेकोटीची आधार घेताना दिसत आहे.

उत्तर भारतात देखील थंडीचा कहर वाढत चालला आहे. डोंगराळ भागात होणाऱ्या बर्फदृष्टीमुळे मैदानी भागात दिवसेंदिवस थंडी वाढत चालली आहे. बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. परिणामी, उत्तर भारतातील अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसू लागला आहे. तर उत्तर भारतात थंडीचा जो अधिक वाढू शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 9 ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गोवा आणि कोकण किनारपट्टी या भागांमध्ये पाऊस चांगलाच धुमाकूळ घालू शकतो.या चक्रीवादळामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या