Maharashtra Winter Update | तापमानाचा पारा 9.5 अंशावर, तर राज्यात यंदा अजून थंडी वाढणार

Maharashtra Winter Update | तापमानाचा पारा 9.5 अंशावर, तर राज्यात यंदा अजून थंडी वाढणार

टीम महाराष्ट्र देशा: डिसेंबर (December) महिना सुरू झाला असून राज्यात (Maharashtra) अधिकच थंडी (Winter) जाणवायला लागली आहे. मागच्या महिन्यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घसरण व्हायला सुरुवात झाली होती. तर, आता राज्यात पुन्हा एकदा थंडीने जोर धरला असून तापमानाचा पारा परत एकदा खाली जाताना दिसत आहे. राज्यामध्ये 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सध्या सातारा-सांगली त्याचबरोबर विदर्भातही कडाक्याची थंडी पडत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागासह शहरातही जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. फेब्रुवारीपर्यंत असणाऱ्या या हंगामामध्ये दक्षिणेकडील राज्यात तसेच पश्चिम, उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरी तापमान कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यामध्ये गायब झालेल्या थंडीने पुन्हा जोरदार आगमन केले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्य परत थंडीने गोठू लागले आहे. दरम्यान, निफाड तालुक्यामध्ये 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी निफाडकर शेकोट्या पेटवताना दिसत आहेत. तर, राज्यामध्ये दिवसाचे कमाल तापमान सरासरी 28.9 अंशाच्या आसपास असते तर रात्रीचे किमान तापमान सरासरी 12.9 अंश सेल्सिअस पर्यंत असते.

विदर्भामध्ये काही जिल्ह्यांत तापमानामध्ये अंशतः वाढ झाली आहे. त्यामुळे विदर्भात दिवसा हलकी आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. दरम्यान, राज्यांमध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी कोणताही पावसाचा अंदाज हवामाना खात्याकडून व्यक्त केला जात नाही.

हवामान खात्याने हिवाळ्यातील चार महिन्याचा अंदाज गुरुवारी जाहीर केला आहे. त्यानुसार भारताच्या पूर्व, दक्षिण आणि उत्तर-पश्चिम भागातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशातील दक्षिण भागांमध्ये देखील काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते. त्याचबरोबर भारतातील दक्षिण भागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

महत्वाच्या बातम्या