राज्यात होणार शेतकऱ्यांची पहिली सहकारी एम आय डी सी

कोल्हापूर : एम आय डी सी च्या धर्तीवर राज्यात शेतकऱ्यांची पहिली सहकारी एम आय डी सी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात नंदनी गावालगत स्थापन होत आहे. स्वाभिमानी औद्योगिक सहकारी एम आय डी सी नावाने स्थापन होत असलेल्या आणि एका अर्थाने स्टार्टअप असलेल्या या एमआयडीसीत खासगी कंपन्यांना उद्योग सुरू करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

३० एकरातील या प्रकल्पाची नोंदणी औद्योगिक विभागाकडे करण्यात आली असून या एमआयडीसीमध्ये जमीन मालक शेअर होल्डर असणार आहेत. ४० शेतकऱ्यांच्या सहकार्यातून उभारला जाणारा हा प्रकल्प सुरू होण्याआधीच सात कंपन्यांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले असून मुख्यत: शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अन्नप्रक्रिया उद्योगावर यात भर असणार आहे. असेही शेट्टी यांनी सांगितले आहे.

Loading...

पुण्याजवळील शेतकऱ्यांनी आयटी उद्योगासाठी जमिनी दिल्या आहेत. यातूनच शेतकऱ्यांना सहकारी एमआयडीसी स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यासाठी आम्ही अगोदर भूखंडांची बँक तयार केली. या सर्व जमिनीला अकृषी जमीन म्हणून मंजुरी मिळवली. त्यानंतर कंपन्यांना येथे प्रकल्पासाठी प्रस्ताव दिले. या शेतकरी सहकारी एमआयडीसीची केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडेही नोंदणी करण्यात आली आहे. असेही शेट्टी यांनी सांगितले आहे.

Add Comment

Click here to post a comment
Loading…