महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई – सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेत हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपणाचा समावेश – आरोग्यमंत्री

बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर हॉस्पिटल या दोन रुग्णालयांचा जन आरोग्य योजनेत सहभाग करून घेण्यासाठी राज्यमंत्री डॉ.यड्रावकर यांनी पाठपुरावा केला होता.

‘मी शाळा शिकलेली नाही,माझी शाळा म्हंटल तर निसर्गाच्या कुशीमध्ये आणि काळ्या मातीमध्ये झालेली आहे

डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे सुमारे २००० बेड व विशेषज्ञ सुविधा या योजनेतंर्गत उपलब्ध होणार असून कॅन्सर हॉस्पिटलमधील १२५ बेड उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये कर्करोग उपचार, शस्त्रक्रिया, रेडिएशन आदी सुविधा मिळणार आहेत.

राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, चंद्रकांतदादांचे विठ्ठलाला साकडे

राज्यात जनआरोग्य योजनेमध्ये यापूर्वी ४५० रुग्णालयांचा सहभाग होता त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवत दुप्पट म्हणजे १००० रुग्णालयांचा सहभाग करण्यात आला आहे. राज्याच्या सीमेलगतच्या भागातील रुग्णालयांचा समावेश या योजनेत झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील नागरिकांना त्याचा फायदा मिळेल, असे आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार – राजेश टोपे

एरियल फवारणीसाठी सेंट्रल इन्सकेटीसाईड बोर्डाची (‘सिआयबी’) परवानगी गरजेची