महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : असे करा आधार प्रमाणिकरण…

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकलं जाणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. दोन लाखांपेक्षा वर असलेल्या कर्जदारांसाठी आणि विशेषत: जे नियमित कर्ज फेडत आहेत त्यांच्यासाठी लवकरच योजना जाहीर करून ती अंमलात आणली जाईल अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यासोबतच शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा राहिला पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती

  • शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
  • पाडळताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
  • कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.
  • मार्चमध्ये होणार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ‘हे’ केलं तरच मिळेल कर्जमुक्ती
  • शेतकऱ्यांना मिळणारा लाभ

    • ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!
    • कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
    • राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !

    यांना लाभ मिळणार नाही

    • आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
    • केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
    • महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
    • सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
    • २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
    • शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती
    • योजनेच्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लीक करा.

      महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 

महत्वाच्या बातम्या –

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या…

शेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित