दूध व्यवसायाकडे महाविकास आघाडी सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – राधाकृष्ण विखे

राधाकृष्ण विखे

अहमदनगर –‘शेतीला जोडधंदा म्हणून उपयुक्त असलेल्या दूध व्यावसायाकडे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दूध दरासाठी इशारा आंदोलन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या दोन बैठका झाल्या, तरीही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांचे दूध संघही कमी दराने दूर खरेदी करीत आहेत,’ असा आरोप माजी मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

राज्यात आज आणि उद्या होणार मुसळधार पाऊस !

दूध दराच्या प्रश्नावर १ ऑगस्टपासून दूध संकलन बंद ठेवण्याचे आंदोलन विविध शेतकरी संघटनांनी पुकारले आहे. भाजपनेही या आंदोलनात भाग घेतला आहे. यासंबंधी बोलताना विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ‘दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्या समस्‍या दिवसेंदिवस वाढत चालल्‍या आहेत. शेतीला जोडधंदा म्‍हणून दूध व्‍यवसाय शेतकऱ्यांना आधार ठरला आहे.

डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

मात्र, या व्‍यवसायाकडे महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. करोनाच्या संकटामुळे दूध उत्‍पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. राज्‍यात आता दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्याही आत्‍महत्‍या सुरू झाल्‍या आहेत. त्‍याच्‍याही संवेदना या सरकारला राहिलेल्‍या नाहीत. करोनाच्या संकटात दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर २५ रुपये हमीभाव देण्‍याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. प्रत्‍यक्षात या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही. महाविकास आघाडी सरकारने दूध उत्‍पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.’ अस विखे पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

७/१२ चा उतारा म्हणजे काय? जाणून घ्या

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या