Share

मका लागवड पध्दत

Published On: 

🕒 1 min read

मक्याची लागवड संबध जगभरात केली जाते. विकसित देशांत मक्याची लागवड प्रामुख्याने जनावरांसाठीचे अन्न आणि इथॅनॉल चा स्त्रोत म्हणुन केली जाते, तर विकसनशिल देशांत मक्याची लागवड धान्य म्हणुन केली जाते. मक्यापासुन स्टार्च, इथॅनॉल बनविले जाते. तसेच मक्या वर स्टार्च बनवितांना त्यापासुन सॉर्बीटॉल, डेक्सट्राईन, सॉर्बीक असिड, लॅक्टिक असिड, बनविले जाते ज्यांचा वापर हा दैनंदिन जीवनात देखिल दिसुन येतो, जसे बीअर, आईसक्रिम, शु-पॉलिश, ग्लु, सिरप, लिहण्याची शाई, फटाक्यांची दारु, बॅटरी, सौंदर्य प्रसाधने, अस्प्रिन वै. मध्ये होत असतो.

मक्याचा उगम झाला मॅक्सिको मध्ये. ७००० वर्षांपुर्वी मक्याची अमेरिका, मेक्सिको, साउथ अफ्रिका येथे लागवड होत होती. १५ व्या आणि १६ व्या शतकात ज्यावेळेस युरोपियन लोकांनी अमेरिकेशी संबंध प्रस्थापित केला त्यानंतर युरोपियन लोक मका त्यांच्या प्रदेशात घेवुन आले. आणि कालांतराने सबंध जगभरात मक्याची लागवड सुरु झाली. सन २००९ मध्ये सबंध जगभरात मक्याची १५९ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर लागवड केली गेली होती. भारत जगातील सन २०१२ च्या आकड्यांनुसार ६ व्या क्रमांकाचा मका उत्पादक देश आहे. अमेरिका मक्याच्या उत्पादनात नंबर १ देश असुन त्यानंतर चिन चा क्रमांक आहे

जमीन

मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली.

पूर्व मशागत

उन्हाळ्यात जमिनीची खोल (15 ते 20 सें.मी.) नांगरट करून कुळवाच्या 2- 3 पाळ्या द्याव्यात. त्या वेळी 25 गाड्या शेणखत प्रति हेक्‍टरी मिसळावे.

सुधारित जाती

  •  लवकर पक्व होणाऱ्या जाती (80 ते 90 दिवस) –
    कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रासाठी.
    संमिश्र जाती – अरुण, किरण, पारस, सूर्या, पुसा लवकर, महिकांचन, मांजरी.
    संकरित जाती – एफएच 3211, एफक्‍युएच 4567.
  • मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जाती (90-100 दिवस) – कोरडवाहू, बागायती आणि थोड्याशा उशिरा पेरणीसाठी.
    संमिश्र जाती – नवज्योत, मांजरी.
    संकरित जाती- डीएमएच 107, केएच 9451, एमएचएच 69.
  •  उशिरा पक्व होणाऱ्या जाती (100-110 दिवस)- वेळेवर पेरणी, निश्‍चित पाऊस किंवा बागायतीची सोय असलेल्या ठिकाणी.
    संमिश्र जाती – प्रभातस धवल, आफ्रिकन टॉल, शक्ती 1.
    संकरित जाती – डेक्कन 103, एनईसीएच 117, एचक्‍यूपीएम 1.

पेरणीची वेळ

15 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान.

पेरणीची पद्धत

  • उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी – ओळीतील अंतर 60 ते 75 सें.मी. व दोन रोपात 20 ते 25 सें. मी.
  • लवकर तयार होणाऱ्या जातीसाठी – दोन ओळीस 60 सें. मी. व दोन रोपात 20 सें. मी.
  • सरी वरंब्यावर पेरणी करताना सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला पेरणी करावी.
  • बियाण्याचे प्रमाण – हेक्‍टरी 15-20 किलोग्रॅम बियाणे पुरेसे.

बीजप्रक्रिया

2 ते 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलोग्रॅम बियाणे. त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक 15 ग्रॅम प्रति किलो बियाणे चोळावे.

रासायनिक खत

  • उशिरा तयार होणाऱ्या जातीसाठी – नत्र, स्फुरद व पालाश 120-60-60 किलो प्रति हेक्‍टर खतमात्रा द्यावी. त्यातील नत्र 40 किलो पेरतेवेळी, 20 दिवसांनी पुन्हा 40 किलो, 40 ते 45 दिवसांनी 40 किलो या प्रमाणे नत्र विभागून द्यावे.
  • आंतरमशागत – पेरणीनंतर 15 ते 35 दिवसांपर्यंत एक ते दोन खुरपण्या आणि कोळपण्याद्वारे तणांचा बंदोबस्त करावा.
  • किंवा तणनाशक वापर- पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी अट्रॉझीन (50 टक्के) हे तणनाशक 1 किलो किंवा पेंडिमिथॅलीन 1 ली प्रति हेक्‍टर 500 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे.

पाणी व्यवस्थापन

  • पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी (पीक वाढीची अवस्था),
  • 40- 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना
  • 75- 95 दिवसांनंतर पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी देणे आवश्‍यक आहे.
  • अनियमित पावसाच्या भागात पाण्याचा ताण असलेल्या काळात 0.2 टक्के थायोयुरियाची (नर व मादी) पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ दिसून आलेली आहे.

झेंडू लागवड पद्धत

पीकविमा कंपन्या आणि बँकांनी शेतकऱ्यांचे हित न जोपासल्यास त्यांना धडा शिकवू ; रामदास कदम

पिक लागवड पद्धत बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या