नाशिकला स्मार्ट शहर बनविण्यासाठी गोदावरी नदीला स्वच्छ, सुंदर करा – छगन भुजबळ

छगन भुजबळ

नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधायुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य देऊन शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमधील गोदावरी नदी काठावर राहाणाऱ्या नागरीकांचे प्रशासनाकडून स्थलांतर

नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज मंत्रालयात सादरीकरण केले. त्यावेळी श्री.भुजबळ बोलत होते.

श्री.भुजबळ म्हणाले, नाशिक शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून, जुने गावठाण ही नाशिकची खरी ओळख  आहे. त्यामुळे नाशिककरांच्या मागणीनुसार जुन्या क्षेत्राच्या विकासासाठी (ABD Area) 598 एकरातील जुन्या गावठाणाची निवड करण्यात आली.  स्काडा प्रणालीच्या सहाय्याने 24 तास पुरेशा दाबाने व  शुद्ध पाणी पुरवठा ABD मध्ये करण्यात येणार आहे.

पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ – शिक्षणमंत्री

स्वयंचलित प्रद्धतीने पुरेसा दाब, विविध ठिकाणी शुद्ध पाण्याची तपासणी, पाणीपुरवठा नलिकांमध्ये लिकेज डिटेक्शन स्वयंचलित पध्दतीने होणार आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी साठवणुकीसाठी टाक्या बांधण्याचा खर्च, वॉटर फिल्टर उपकरणांवरील खर्च, तसेच पाणी साठवणुकीच्या प्रवृत्तीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय, यागोष्टी टाळणे शक्य होणार आहे.  यामुळे पाण्याची बचत होवून सद्यस्थितीतील 43 टक्क्यांवरील नॉन रेव्हेन्यु वॉटर (NRW) 10 टक्क्यांच्या खाली आणणे शक्य होणार आहे, तसेच स्वयंचलित प्रणालीमुळे कोठेही बिघाड झाल्याची माहिती आपोआप नियंत्रण कक्षात समजून ती दुरुस्ती तात्काळ करता येईल.

भुईमूगाच्या बियाण्याच्या शासनस्तरावर अनुदान देण्यात संदर्भात संभ्रम निर्माण

गोदावरी नदी स्वच्छ झाल्याशिवाय स्मार्ट शहर होऊ शकत नाही. नदीमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी वेगळे करावे व त्यावर प्रक्रिया करण्यात यावी. नाशिक शहर स्मार्ट बनविताना शहराच्या मधून जाणारी गोदावरी नदी पर्यावरणाचे संरक्षण करुन स्वच्छ व सुंदर बनविण्याचे निर्देश श्री.भुजबळ यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्रातील हवामान कोरडेच राहील तर जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा नाशिक स्मार्ट सिटीचे चेअरमन सीताराम कुंटे व स्मार्ट सिटी संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले

दोन दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण