मल्हारराव होळकरांविषयी हीन दर्जाचे लिखाण ; ‘जोडेमार’ आंदोलनाद्वारे जितेंद्र आव्हाडांचा निषेध

टीम महाराष्ट्र देशा- मल्हारराव होळकर यांच्याविषयी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांतून कथित हीन दर्जाचे लिखाण केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात मल्हार युवा प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या प्रतिमेला ‘जोडेमार’ आंदोलन करण्यात आले.

फेसबुकवर ठाणे येथील माहितीची पोस्ट टाकताना आमदार आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी मानहानीकारक लिखाण केल्याचा आरोप सोलापूरच्या मल्हार युवा प्रतिष्ठानने केला आहे. या कथित लिखाणाच्या निषेधार्थ या संघटनेच्यावतीने चार हुतात्मा पुतळा चौकात गाढवाला आमदार आव्हाड यांची प्रतिमा लटकवून त्यास जोडे मारण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष समर्थ मोटे यांनी नेतृत्व केलेल्या या आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक तथा बजरंग दलाचे स्थानिक नेते नरेंद्र काळे यांचाही सहभाग होता.

जितेंद्र आव्हाड यांनी संजय काकडेंची अक्कल काढली