माणगावला क्रीडा संकुलाचे काम त्वरीत सुरु करणार – आदिती तटकरे

आदिती तटकरे

अनेक वर्षांपासून कोकण विभागासाठी विभागीय क्रीडा संकुल मंजूर होऊन संकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्याने हे संकुल होऊ शकले नाही. रायगड जिल्ह्यातील माणगाव हे मध्यवर्ती ‍ठिकाण आहे आणि तेथे जागाही उपलब्ध आहे. त्यासाठी या संकुलाचे काम माणगाव येथे तातडीने सुरु करावे, असे निर्देश क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी  दिले.

मंत्रालयात कोकण विभागासाठी मंजूर असलेल्या क्रीडा संकुलच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी राज्यमंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

माणगाव येथे 10 हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध आहे. ती जागा क्रीडा संकुलसाठी तातडीने हस्तांतरित करावी आणि संकुलाच्या कामाला सुरुवात करावी. त्यासाठी लागणारा 45 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री कुमारी तटकरे यांनी दिल्या.

माणगाव हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने कोकण विभागातील सर्व खेळाडूंसाठी सोयीचे आहे. या क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांसाठी उत्तम प्रशिक्षण सुविधा आणि निवास व्यवस्थासुद्धा करण्यात यावी. या संकुलामुळे कोकण विभागातील सर्व खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण आणि खेळांची तयारी करण्याची संधी उपलब्ध होईल, असेही कुमारी तटकरे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीला जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांत अधिकारी, क्रीडा उपसंचालक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

बीड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर महिला दक्षता समिती स्थापन करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

जयभवानी सहकारी साखर कारखाना उसाला देणार 2400 रुपये भाव

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हवी बायोमॅट्रीकची सक्‍ती

बजाज पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश