पुणे : मान्सून महाराष्ट्रात पोहोचला आहे. अवघ्या महाराष्ट्रात पावसाने मोठा जोर धरला आहे. काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भाच्या काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. येत्या २४ तासांमध्ये मराठवाड़ा आणि कोकणात मध्यम पाऊस असेल, असा अंदाज स्कायमेटने सांगितला आहे.
तसेच पुढील काही तासांमध्ये अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटी वादळासह पाऊस पडेल.
चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करण्याची गरज- रोहिणी भरड
देशभरात येत्या २४ तासांमध्ये आंध्र प्रदेश, आंतरिक कर्नाटक, तमिलनाडु, रायलसीमा, गोवा, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि मध्य प्रदेश या भागात पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.