मान्सूनच्या संदर्भातील वृत्त आले आहे. यंदा मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर शनिवारपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या वाटचालीला पोषक वातावरण निर्माण होऊन येत्या शनिवारपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
दरवर्षी साधारणत: 20 मे च्या दरम्यान मान्सून अंदमान-निकोबारच्या बेटांवर दाखल होतो. यंदा पाच दिवस आधीच तो दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये दि. 1 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दहा जूननंतरच तो दाखल होईल. यंदा मान्सून शंभर टक्के बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
रात्री केस धुवत असाल तर सावधान
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी वर्ग शेतीची काम करीत असतो. त्यामुळे आता शेतकरी वर्ग मान्सूनच्या अहवालाचा अंदाज घेऊन पेरणी करायला घेऊ शकतो. हा मान्सूनचा प्राथमिक अहवाल आहे. असाच अहवाल याआधीही हवामान खात्याने जाहीर केला होता. त्यामध्ये ही यंदा मान्सून राज्यावर चांगलचं बरसणार असल्याचं सांगितले होते.