टीम महाराष्ट्र देशा- मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या जिल्हा बंद आंदोलनात पोलिसांवर हल्ले झालेले गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत शासन विचार करेल असे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गला आश्वासन दिले.
मराठा क्रांती मोर्चाने जिल्हय़ात दि. २६ जुलला बंद आंदोलन केले. त्या वेळी मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली नाही, परंतु एका प्रकरणात पोलिसांवर हल्ले झालेले आहेत, हल्ले झालेले प्रकरण वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यासाठी निश्चितच विचार केला जाईल असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले असे गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे, मात्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही असे गुन्हे मागे घेण्याबद्दल शासन निर्णय घेईल असे या शिष्टमंडळाशी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अँड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडीत शिष्टमंडळाने भेट घेतली.
भीमा कोरेगाव प्रकरणी हल्लेखोरांकडून नुकसान भरपाईही वसूल केली जाईल : पालकमंत्री दीपक केसरकर
सरपंच सोडा राणे स्वतःचा मुलाला निवडून आणू शकत नाही – दीपक केसरकर