Maruti CNG Car | मारुतीची ‘हि’ CNG नवीन अवतारामध्ये लाँच

Maruti CNG Car | मारुतीची 'हि' CNG नवीन अवतारामध्ये लाँच

टीम महाराष्ट्र देशा: देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता लोक पेट्रोल डिझेल टाळण्यासाठी इतर पर्याय शोधत आहे. त्यामध्ये CNG कारचा पर्याय लोकांना एक सर्वोत्तम मार्ग वाटत आहे. कारण CNG वाहने लोकांना अनेक फायदे देत आहे. त्यामध्ये किमती पासून मायलेज पर्यंत सर्वच गोष्टींचा फायदा होतो. कारण पेट्रोल डिझेल कार पेक्षा CNG कार ची किंमत कमी असते. त्याचबरोबर CNG गाड्या चांगले मायलेज देऊन पर्यावरणाची फारशी आणि करत नाही. याच परिस्थितीचा फायदा घेत देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपली S-Presso CNG बाजारात नव्या अवतारामध्ये लॉन्च करत आहेत. मारुती सुझुकी ने देशात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये दीर्घकाळ कब्जा केलेला असून मारुतीच्या CNG सेगमेंटमध्ये या कंपनीला टक्कर द्यायला कोणीही नाही. कंपनीने नुकतीच आपली CNG कार S-Presso लाँच केली आहे.

S-Presso इंजिन

मारुतीने लाँच केलेली ही नवीन CNG कार 1.0-L नेक्स्ट जनरेशन ड्युअल जेट आणि ड्युअल VVT इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 5300rpm वर 56.69 PS पॉवर आणि CNG मोडमध्ये असताना 3400rpm वर 82.1Nm मॅक्झिमम डार्क जनरेट करू शकते. मारुतीची ही नवीन CNG कार 32.73 km/kg मायलेज देण्यात सक्षम आहे.

S-Presso किंमत

मारुतीच्या या CNG वेरियंटच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, या गाडीची एक्स-शोरुम किंमत 5.90 लाख रुपये एवढी आहे.

S-Presso दिवाळी स्पेशल ऑफर

S-Presso च्या पेट्रोल व्हेरियंट वर 35,000 रुपयांपर्यंत रोक डिस्काउंट आहे तर, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे.

महत्वाच्या बातम्या