जालना – मागच्या महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती कोरोनाची तिसरी लाट आली असं म्हंटल्या जात होत. तर सध्या मागील काही दिसापासून देशासह राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होताना दिसत आहे. तर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी महत्वाची माहिती दिली आहे. त्याच सोबत मास्क (Mask) मुक्ती बाबत देखील चर्चा सुरू आहे, मात्र मास्क मुक्ती सध्यातरी केली जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्याच सोबत लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधी पर्यत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल. तसेच सध्या राज्यात मास्क मुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिलीय.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी – उद्यापासून राज्यात थंडीचा कडाका कमी होणार
- रोज ‘केळी’ खाल्यास हे होतात फायदे ; घ्या जाणून !
- शेतकऱ्यांना पशुधनापासून मिळणारे उत्पादन वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न – अजित पवार
- जाणून घ्या ; दररोज ‘बिट’ झाल्याचे आरोग्यदायी फायदे !
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेसाठी आता ‘हे’ कागदपत्र लवकरात लवकर जमा केले तरच मिळणार पैसे…..
- मोठा दिलासा – सलग चौथ्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ