अखंड हरिनाम सप्ताहात सप्ताह कमिटीच्या वतीने भव्य कृषी प्रदर्शन

कृषी प्रदर्शन

येवला – अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत सप्ताह कमिटीच्या वतीने भव्य कृषी प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्या प्रदर्शनात अनेक शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट तसेच कृषी आधारित व्यवसायातील मंडळी सहभागी होत आहेत. तळवाडे येथे सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७२ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रांगणात सप्ताह कमिटीच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे.

प्रदर्शनाच्या निमित्ताने येवला कृषी विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, मक्यावरील लष्करी अळी, कपाशीवरील गुलाबी बोण्डअळी याबाबत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे, भाऊसाहेब काळोखे, मंडळ कृषी अधिकारी के.वाय. सिद्दीकी, डी.जी. गायके, क्षिरसागर, कृषी सहायक जयश्री जाधव, कल्पना आहेर, मोरे, संतोष गोसावी, वारुळे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहेत.

Loading...

प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग , औजारे क्षेत्रातील विविध कंपन्या तसेच ट्रॅक्टर, प्रक्रि या उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअरेज उद्योग, ड्रिप, टिश्यू कल्चर क्षेत्रातील नामांकीत कंपन्यानी सहभाग घेतला होता. आदर्श शेती, शेतीपूरक व्यवसायातील तंत्र, प्रयोग तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे तसेच कलमे रोपे, गांडुळखत याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

संत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार – कृषिमंत्री

एक झाड लावून चार वर्षे त्याची जोपासना केल्यानंतरच विद्यार्थ्यांना पदवी

Loading...

जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयचा छापा ; ‘नोटा’ मोजण्यासाठी मागवले ‘मशिन’!

Add Comment

Click here to post a comment




Loading…