नवीन आरोग्य संस्था आणि श्रेणीवर्धनासाठी बृहत आराखडा अद्ययावत करावा – राजेंद्र पाटील-यड्रावकर

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

मुंबई – राज्यातील ग्रामीण रुग्णालयांच्या उन्नतीकरणावर भर देतानाच नवीन आरोग्य संस्था स्थापन करणे तसेच सद्यस्थितीतील संस्थांचे श्रेणीवर्धन करणे ही काळाजी गरज असून त्यासंदर्भात  विभागाने आरोग्य संस्थांचा बृहत आराखडा अद्ययावत करावा, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. माण तालुक्यातील बिजवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला तत्वत: मान्यता देत प्रस्ताव सादर करण्याची सूचना श्री.पाटील-यड्रावकर यांनी आरोग्य विभागाला केली.

सातारा जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांबाबत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठक घेतली. बिजवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध मागण्यांचे पत्रही राज्यमंत्री यड्रावकर यांना देण्यात आले होते. बैठकीस आरोग्‍य सेवा संचालनालय संचालक डॉ.साधना तायडे, आरोग्‍य सेवा संचालनालय मुंबईचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतानाच नवीन आरोग्य संस्था स्थापन तथा श्रेणीवर्धन करण्यासाठी बृहत आराखडा अद्ययावत करणे, स्थानिक नागरीक आणि लोकप्रतिनिधी यांच्या सूचनांचा विचार करणे यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –