#MeToo :अनु मलिक यांच्यावर ‘या’ दोन प्रसिद्ध 2 महिलांचे धक्कादायक आरोप

मुंबई : गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी 2 महिलांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध म्यूजिक डायरेक्टर अनु मलिकवर यौन शोषणाचे आरोप लावण्यात आले आहेत. या दोन्ही महिलांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत आपली ओळख दाखवत धमकावल्याचा देखील आरोप केला आहे.

मिड डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये या महिलांनी सांगितले. 90 च्या दशकात मेहबूब स्टुडिओमध्ये एका गाण्याचे शूटिंग सुरु होते. ज्यावेळी या महिला त्यांना भेटायला गेल्या होत्या त्यावेळी अनु मलिक यांनी त्यांना चुकिच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. त्यासाठी अनू मलिक यांनी त्यांची माफी सुद्धा मागितली होती.

यानंतर एकदा यापैकी एका महिलेला त्यांने काही कामानिमित्त घरी बोलावले. आधी काही काळ औपचारिक गप्पा मारल्या आणि त्यानंतर त्यांनी माझा स्कर्टवर केला. त्यांना ढकलून मी दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवलं पण या प्रसंगाबाबत कोणाला काहीच न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली होती. नंतर मला घरी सोडताना त्यांनी पुन्हा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला,’ असं त्या महिलेचा आरोप आहे. तर दुसरा आरोप करणारी महिला इंडियन आयडलच्या काही वर्षांपूर्वीच्या भागाची स्पर्धक आहे.