टीम महाराष्ट्र देशा: राज्यात मुंबईमध्ये दिवसेंदिवस गोवर (Measles) चे रुग्ण वाढत आहे. लहान मुलांसह प्रौढांना देखील गोवरची लागण झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. मालेगाव, पनवेल, भिवंडी आणि गोवंडी हे गोवरचे हॉटस्पॉट बनले आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांमध्ये लसीकरणाद्वारे गोवर (Measles Vaccine) संसर्गावर संपूर्ण नियंत्रण मिळवता येईल असे आरोग्य मंत्री यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर कुणीही गोवरचे लसीकरण चुकवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. कारण लाखो मुलांनी गोवरची लस चुकवल्यामुळे गोवर हा जागतिक स्तरावर मोठा धोका बनला आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युएसच्या ताज्या रिपोर्टनुसार, गोवर हा एक जागतिक धोका बनला आहे. जगभरात विविध ठिकाणी गोवर पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. WHO ने सांगितल्याप्रमाणे, गेल्या वर्षी सुमारे 40 दशलक्ष मुलांनी गोवरच्या लसीकरणाचे डोस चुकवले आहे. त्याचबरोबर UN दिलेल्या माहितीनुसार 25 दशलक्ष मुलांनी डिप्थीरियासह अनेक रोगांविरूद्धचे लसीकरण चुकवले आहे. लोकांचे कोरोना लसीकरणाकडे लक्ष लागल्यामुळे अनेकांनी बाकी लसीकरणांकडे दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत लवकरात लवकर गोवरचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. कारण गोवर हा रोग लसीकरणाद्वारे जवळजवळ पूर्णपणे टाळता येऊ शकतो.
गोवर (Measles) ची लक्षणे
गोवर प्रामुख्याने लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो. सामान्य ताप, खोकला, कोझिया, लाल पाणावलेले डोळे हे गोवरचे प्रमुख लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसायला लागल्यानंतर दोन-तीन दिवसांमध्ये तोंडावर लहान पांढरे डाग दिसू लागतात. त्यानंतर तीन ते पाच दिवसांनी संपूर्ण शरीरावर पुरळ उठते. ही पुरळ लाल ठिपक्यांसारखी दिसते. ही पुरळ संपूर्ण शरीरावर कुठेही येऊ शकते.
भारतामध्ये गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, केरळ आणि बिहार या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर मुंबईमध्ये यावर्षी गोवरचे तब्बल 233 रुग्ण आढळले आहे. या रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर भिवंडी येथे गोवरमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजी या मुलाच्या शरीरावर पुरळ आली होती. मंगळवारी संध्याकाळी त्याला बीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण काही तासातच त्याचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही, तर धमकी देतो…”, संजय राऊतांचा सज्जड दम
- Balika Vadhu | बालिका वधूमधील ‘या’ अभिनेत्रीने केली प्रेग्नेंसीची घोषणा
- Ajit Pawar | फडणवीसांना आव्हान देणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले,
- Bisleri | बिसलेरीच्या बॉटलवर असेल आता ‘TATA’ चे नाव, 7 कोटीमध्ये घेतला ब्रँड विकत
- Basavaraj Bommai । “तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना इशारा