लातूर – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख हे उद्या, दि. १८ आणि परवा १९ ऑक्टोबर रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.
अतिवृष्टी आणि पुरामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्याच काही भागात खरीप पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागाला वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित देशमुख हे रविवार व सोमवार दोन दिवस भेटी देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना दिलासा देतील.
महत्वाच्या बातम्या –
- पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्याकडची नाणी विकून होऊ शकता लखपती
- राज्यात पुन्हा चक्रीवादळाच सावट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार तडाखा
- रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या
- अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर