महाअर्थसंकल्प : शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानावे मिळणार अपघात निधी

महाअर्थसंकल्प

राज्याचा आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार हे अर्थसंकल्प सादर करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्वाचा मानला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि औद्यगिक क्षेत्रासाठी काही विशेष तरतुद करण्यात आल्या आहेत.

या अर्थसंकल्पानुसार दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राज्यात शेतकरी अपघात योजना राबवण्यात येणार आहे.शेतकऱ्याचा अपघात झाल्यास या योजने अंतर्गत शेतकऱ्याला व त्याच्या कुटुंबाला मदत मिळणार आहे.

काही विशेष महत्वाच्या तरतुदी

 • जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटी
 • कृषीसिंचन योजनेसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद, मागील 4 वर्षात 140 सिंचन योजना पुर्ण
 • शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात योजना नव्या सुधारणांसह लागू, शेतकरी कुटुंबालाही मिळणार लाभ
 • जलयुक्त शिवार योजनेवर 8946 कोटी रुपये निधी खर्च
 • अन्न प्रक्रिया योजनेसाठी मुख्यमंत्री कृषी योजनेअंतर्गत ४७ प्रकल्पांना मंजुरी
 • शेतकऱ्यांना थेट बाजार पेठ मिळवून देण्यासाठी २२२० कोटी
 • चार कृषी विद्यापीठांना 600 कोटी रुपयांची तरतूद
 • दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर 4 हजार 563 कोटींचा निधी
 • राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ
 • जमिन महसूलात सूट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती,
 • कृषीपंपाच्या चालू वीज देयकात 33.5 टक्के सुट
 • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
 • टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे हे विशेष निर्णय
 • सन २०१९ च्या मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता
 • नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ रु. ६ हजार ४१० कोटी एवढी तरतूद अर्थसंकल्पात असून त्यानंतरही आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करणार
 • राज्यातील २६ अपुर्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश, सदर प्रकल्पांची उर्वरित किंमत २२ हजार ३९८ कोटी असून त्यापैकी ३ हजार १३८ कोटी केंद्रीय अर्थसंकल्प प्राप्त होणार
 • मागील साडेचार वर्षात १४० सिंचन प्रकल्प पुर्ण, प्रामुख्याने बावनथडी मुख्य प्रकल्प, नांदूर मधमेश्वर प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, निम्न पांझरा मध्यम प्रकल्प व उर्ध्व कुंडलिका प्रकल्पांचा समावेश

राज्यातील नदीजोड प्रकल्प मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पालेभाज्या आणि त्याचे फायदे