शाओमीचा ‘दिवाली विथ मी’ सेल

शाओमीने ‘दिवाली विथ मी’ या नावाने सेल जाहीर केला असून याच्या अंतर्गत कंपनीच्या विविध प्रॉडक्टवर अनेक आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

सणासुदीच्या कालखंडात विविध शॉपींग पोर्टल्सवर सेल आयोजित करण्यात येत आहेत. याच्या सोबत काही कंपन्यादेखील ग्राहकांना विविध सेलच्या माध्यमातून याच प्रकारच्या सवलती देत आहेत. या अनुषंगाने आता शाओमीने ‘दिवाली विथ मी’ हा सेल जाहीर केला आहे. २३ ते २५ ऑक्टोबरच्या दरम्यान हा सेल आयोजित करण्यात आला आहे. यात स्मार्टफोनसह अन्य उपकरणे आणि अ‍ॅसेसरीजवर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये मीए२, रेडमी नोट५ प्रो आणि रेडमी वाय२ या मॉडेल्सवर ग्राहकांना दोन हजारांची सवलत मिळत आहे. याशिवाय, मी एलईडी स्मार्ट टिव्ही ४ए, मी ब्ल्यु-टुथ स्पीकर बेसिक २, ब्ल्यु-टुथ ऑडिओ रिसिव्हर, मी राऊटर ३सी, मी पॉवरबँक २ आय, मी बँड आणि अन्य अ‍ॅसेजरीजवरही ग्राहकांना सवलत मिळणार आहे. शाओमीचा ४३ इंची स्मार्ट टिव्ही आता फक्त २१९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.

Loading...

शाओमीच्या या सेलमध्ये कंपनीने इक्झीगो, अमेझॉन पे, पेटीएम, मोबीक्विक आदींसोबत सहकार्याचा करार करून अनेक ऑफर्स, कॅशबॅक डील्स, कुपन्स जाहीर केले आहेत.

Add Comment

Click here to post a comment
Loading…