दूध आणि गूळ आरोग्‍यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

गूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर बर्‍याच रोगांशी देखील मुक्ती मिळते. आपल्यापैकी अनेकांनी आपल्या घरात वृद्धांना पाहिले असेल, की ते दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर तोंडात गुळाचा एक खडा तोंडात टाकून त्यावर पाणी प्यायचे. ते आपल्याला देखील गूळ खाण्याची सल्ला देत असतात. याचे कारण गुळामध्ये अनेक आरोग्य लाभ आहे. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • दररोज झोपण्‍यापूर्वी एक ग्‍लास दुधा आणि गूळ किंवा मध घेतल्‍यास वजन कमी होण्‍यास मदत होते. याशिवाय दूधाचे आणि गुळाचे अनेक फायदे आहेत. खोकला आला तर आपण फक्त गुळाचा एक लहानसा तुकडा खाल्ला तरी त्यामुळे फरक पडतो. त्‍यामुळे दूध आणि गुळाचा आपल्‍या आहारात समावेश करायला विसरु नका.
  • जर आपल्याला दम्याचा त्रास असेल तर घरी गूळ आणि काळ्या तिळाचे लाडू बनवून खा आणि त्यानंतर एक ग्लास दूध घ्या.
  • दूधातील विटामिन डी, कॅल्‍शियम आणि गुळातील लोह पायाच्‍या दुखण्‍यापासून आराम देते. गुळाबरोबर आल्ले खाल्‍यास याचा फायदा शरिरास होतो.
  • गुळ शरिरातील रक्‍तशुद्धीसाठी उपयुक्त ठरते. मासिक पाळीच्‍या कालावधीत गुळ आणि दूध घेतल्‍याव शरिराला फायदा होतो.
  • गुळामुळे आहार चांगल्‍याप्रकारे पचन होण्‍यास मदत होते. गूळ शरिराच्‍या पचनसंस्थेला आजारापासून लांब ठेवते. रोज झोपण्‍यापूर्वी ग्‍लासभर दूधात गुळाचा एक खडा घालून प्यायल्‍यास पचन प्रक्रिया सुरळीत होते.
  • स्नायू मजबूत करण्यासाठी – दररोज एका ग्लास दुधात थोडे गूळ मिसळून प्यायल्याने नक्कीच फायदा होतो.

महत्वाच्या बातम्या –