दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ कोटी २० लाख रुपये अदा

रत्नागिरीत दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ कोटी  २० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. यामुळे फक्त सप्टेंबर महिन्याचा पगार शेतकऱ्यांना मिळाला आहे.  मागील चार महिन्यापासून  या उत्पादकांना पगार मिळालेला नाही. याबाबत नुकत्याच पार पाडलेल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न गाजला. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर १ कोटी ५९ लाख मंजूर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. प्रत्यक्षात अधिवेशन संपून दोन आठवडे झाले, तरी दूध उत्पादकांच्या खात्यावर कोणतीच रक्कम जमा करण्यात आली नाही.

येवलेंचा चहा भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक खुलासा 

त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये नाराजी वाढत होती. दोन दिवसांपूर्वी ही रक्कम उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याचा पगार या रकमेतून अदा करणे शक्य झाले आहे. ही रक्कम अदा करताना शेतकऱ्यांनी‍ खरेदी केलेल्या खाद्याची रक्कम तातडीने वळती करण्यास शासन विसरलेले नाही. त्यामुळे उत्पादक नाराज आहेत.

सतत चिडचिड होत असेल तर याकडे थोडं लक्ष द्या

शासनाला वेळच्या वेळी पगार देण्याचे स्मरण राहत नाही. पण, चार महिन्यांनंतर एक पगार देताना खाद्याचे पैसे कापण्याचे स्मरणात राहते, अशा शब्दात दूध उत्पादकांनी राग व्यक्त केला.