कृषी राज्यमंत्र्यांनी केली पिकाची पाहणी ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले

कृषी राज्यमंत्री

चिकणी (जामणी) : पढेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये सहाय्यक कृषी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कृषी कार्यालयाचे उदघाटन हे कृषी तथा फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले. सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी पढेगाव येथे जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत दुर्गे व गणेश हिंगे यांच्या सोयाबीन ह्या पिकाची पाहणी केली. त्यावेळेस त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशनच्या वतीने नदी, नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरण करण्यात आले व याचा शेतकऱ्यांना कितपत लाभ होत आहे, याचीसुद्धा पाहणी त्यांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीला पुरक जोडधंदा निर्माण केल्याशिवाय शेती परवडणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व संत वसंत बाबा युवा क्रीडा मंडळ यांनी सहकार्य केले.

महत्वाच्या बातम्या –

काही लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?

काही लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?

नवनीत कौर राणा संसदेतून थेट शेतात ; सोयाबीनची केली पेरणी