राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, ‘या’ मंत्र्यांना मिळू शकतो डच्चू

टीम महाराष्ट्र देशा- राज्य मंत्रिमंडळाच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरु झाल्या असून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. 12 किंवा 13 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांची खूर्ची जाणार असल्याचं बोललं जात आहे.

खडसे यांना परत मंत्री केले जाईल का या बाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांच्या समावेशाला भाजपा श्रेष्ठींनी अद्याप होकार दिलेला नाही,असे सूत्रांनी सांगितले. खुद्द मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खडसेंना पुन्हा मंत्री करण्याचा आग्रह आहे. मात्र, खडसेंबाबत हायकमांड नाराज असल्याचे चित्र आहे.

या मंत्र्यांना दिला जाऊ शकतो डच्चू

फेरबदलात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, विद्या ठाकूर यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे देखील डेंजर झोनमध्ये असल्याचं बोलले जात आहे.

या नेते मंडळींची लागू शकते मंत्रीपदी वर्णी

विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.विद्या ठाकूर यांना वगळून योगेश सागर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.

अजितदादांमुळेच आम्ही सत्तेत – गिरीश महाजन