मसूर मिश्र लागवड शेतकऱ्यांना ठरेल फायदेशीर; जाणून घ्या कसे ते…..

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषीक्षेत्र मजबूत होत चालले आहे. सर्व समस्यांना मात देत भारतीय शेतकरी उत्पादनात वाढ करत आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत कृषी उत्पादने बाबतीत भारत हा स्वावलंबी बनत चालला आहे. देशातील शेतकरी प्रत्येक हंगामात कडधान्य पिकाची लागवड करत आहे. पण बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामात ते बहुदा शक्य होत नाही. परंतु रब्बी हंगामात मात्र शेतकरी कडधान्य पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतो. या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्याने जर मुख्य कडधान्य पीक मसूराची मिश्र शेती केली तर मसूर शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देऊ शकते.

यावर्षी झालेल्या खराब हवामानामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. परंतु रब्बी हंगामात शेतकरी मुख्य कडधान्य पीक असलेल्या मसूराची शेती करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून मागील हंगामातील नुकसान भरपाई करू शकतात. शेतकरी मोहरी किंवा इतर पिकांसोबत मसूरची पेरणी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मसूर लागवडीसाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्याला एकाच शेतातून दुप्पट नफा कमवता येईल.

मसूर शेती करताना या गोष्टींची काळजी घ्या

मसूर हे एक मुख्य कडधान्य पीक आहे. त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी जमिनीची चाचणी करून घेणे हे आवश्यक आहे. मसुराची लागवड फक्त रब्बी हंगामात केली जाते. मसूराच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान मसूराची पेरणी करावी. हलकी चिकन माती मसुराच्या लागवडीसाठी सर्वात योग्य पर्याय आहे. त्याचबरोबर शेतकरी लाल लॅटराईट जमिनीतही मसूर पेरू शकतात. मसूर पेरणीसाठी मुख्यतः सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा. इतर पिकांप्रमाणे मसूराच्या उत्पादनात माती आणि हवामान खूप महत्त्वाची बजावतात. त्यामुळे मातीचे pH मूल्य 5.8-7.5 या दरम्यान असावे. पिकाच्या पेरणी पासून ते झाड वाढणी पर्यंत चांगल्या उत्पादनासाठी हवामान थंड आणि तापमान 18 ते 30 अंश सेल्सियस पर्यंत असावे.

मसूराची बियाणे

मसूर पिकाच्या लागवडीसाठी हेक्टरी 30 ते 35 किलो बियाणे लागते. चांगल्या उत्पादनासाठी बियाणांवर पेरणीपूर्वी 5 ग्रॅम रायझोबियम कल्चर आणि 5 ग्रॅम स्फुरद जिवाणू PSB कल्चर ची प्रक्रिया करून त्यांना सावलीच्या जागी वाळवून दुसऱ्या दिवशी बियाणे ड्रिल मशीनच्या साह्याने पेरावे. या प्रक्रियेमुळे उत्पादनात वाढ होऊ शकते.

मसूर उत्पादनासाठी लागणारे खत आणि सिंचन

कडधान्य पिकांच्या लागवडीमध्ये माती परीक्षण करून त्यावर आधारित खतांचा वापर करणे अधिक चांगले असते. त्याचबरोबर शेतकरी मसूरच्या चांगल्या उत्पादनासाठी गांडूळ खत, शेणखत, आणि सेंद्रिय खतांचा देखील वापर करू शकता. मसूर या पिकामध्ये दुष्काळ सहन करण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे हे पीक कमी पाण्यात देखील भरघोस उत्पन्न देऊ शकते. या पिकाला पहिले पाणी पेरणीनंतर 45 दिवसांनी म्हणजेच खुरपणीच्या वेळी द्यावे लागते. तर दुसरे पाणी शेंगा तयार होण्याच्या वेळी म्हणजेच पीक पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी द्यावे.

मसूराच्या लागवडीतून मिळणारे उत्पन्न

मसूर पिकाची योग्य मशागत करून योग्य हवामानाखाली पेरणी केल्यास 110 ते 140 दिवसात हेक्टरी 20 ते 25 क्विंटल पर्यंत धान्याचे उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर मसूर पिकापासून जवळजवळ 30 ते 35 क्विंटल जनावरांसाठी चारा तयार होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या –