आता राष्ट्रवादीचे माजी खासदार लाभार्थी; अर्ज न भरताच कर्जमाफीचा लाभ

टीम महाराष्ट्र देशा: सरकारच्या कर्जमाफी योजनेतल्या घोळांची मालिका काही थांबण्याच नाव घेत नाही. नुकतच कोल्हापूरातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी कोणताही अर्ज न भरता त्यांना २५ हजारांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. आता जळगावचे माजी खासदार वसंतराव मोरे यांनी कोणताही अर्ज भरला नसताना कर्जमाफी योजनेचा लाभ त्यांना मिळाला आहे. त्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 15 हजार 482 रुपये जमा झाले आहेत.

त्यामुळे ज्यांना खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे, त्यांना लाभ मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्जमाफी देताना बोगस तसंच राजकीय पदाधिकारी लाभार्थी बनू नये याकरिता शासनानं काळजी घेऊनही त्यात एवढ घोळ होतातच कसे असा प्रश्न समोर आला आहे. तर आमदार खासदार कर्जमाफीचे लाभार्थी झाल्याने सरकारच्या या प्रक्रियेवर प्रश्चचिन्ह निर्माण झालंय.