लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

कृषी सहसंचालक कार्यालय

लातूर – लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल खळ्ळ-खट्याक केलं. हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही ‘महाबीज’सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. महाबीज, अकोला या कंपन्यांविरोधात लातूर जिल्ह्यात ३८१२ तक्रारी आहेत. तर इतर खाजगी कंपन्यांविरोधात ४२६९ तक्रारी आहेत.

सोयाबीन बियाणे उगवण संदर्भातील तक्रारींबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही – दादाजी भुसे

दोषी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठीचा पाठपुरावा लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाकडे अनेकदा करुनही महाबीजवर जिल्ह्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे कृषी विभाग महाबीजला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला असून या ठिकाणी तोडफोड केली. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. झी २४ तास वृत्तवाहिनीने सदर वृत्त दिले आहे.

यंदाचा मान्सून 4 दिवस उशिराने, केरळमध्ये 1 जून ऐवजी 5 जूनला मान्सून दाखल होणार !

दरम्यान, सोयाबिनच्या बियाण्यांबाबत कृषी विभागाकडे राज्यभरातून सुमारे ५० हजार तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ७० टक्के तक्रारींची पडताळणी केली असून यंदा प्रथमच बियाणे उत्पादकांवर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. यामध्ये महाबीजच्या बियाण्याबाबतही तक्रारी आल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.

सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणी बियाणे उत्पादकांवर गुन्हे दाखल – दादा भुसे

मात्र, या कंपनीला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप लातूर मध्ये मनसेने केला आहे. तर बोगस बियाणांबद्दल एकूण फक्त ५३ हजार तक्रारी असून केवळ ५० ते ५५ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी ४ दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं. त्यांना काय कारवाई केली याची माहिती दिली होती. आतापर्यंत खाजगी १५ कंपन्यांवर गुन्हे दाखल केले असून महाबीजवर गुन्हे दाखल करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, हे समजून सांगितल्यानंतरही केबिनच्या काचा, कंम्प्यूटर फोडले असल्याचं, अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

शेतकरी बांधवांना चिंतामुक्त व समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द – दादाजी भुसे

करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी