शेतकरी संपात मनसेचा आक्रमक सहभाग !

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्यासह देशभरातून सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत असतना असून भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी माळशिरस तालुका मनसेच्यवतीने रस्त्यावर दूध व भाजीपाला टाकुन अंदोलन करण्यात आला.

शेतीमालाला दुधाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांनी १ जूनपासुन संप पुकारला आहे. वर्षभर अन्नधान्य, भाजीपाला दुधाला बाजार भाव मिळत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य करीत नसुन सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी, सातबारा कोरा करा, शेतीमालाला उत्पादन खर्च अधीक ५० टक्के हमी भाव दुधाला हमी भाव आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

यावेळी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप घोत्रे, माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, तालुका अध्यक्ष सुरेश टेळे ,जिल्हा उपाध्यक्ष मदन माने -देशमुख, कुंडलीक मगर, बाबा ननवरे, मंगलताई चव्हाण, सुरेश वाघमोडे, नवनाथ करे, अमित दोशी यासह अनेक शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.