मोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातली

टीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमध्ये काल एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली, हा व्हीडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे.भाजपाच्या ट्विटर पेजलाही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

बिजापूरला मंचावर एक आदिवासी महिलेला फक्त चप्पलच भेट देण्यात आली नाही, तर मोदी यांनी खाली वाकून या महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चरण पादुका योजना आहे, ज्यात चप्पल वाटण्यात आल्या. या प्रकारच्या योजनेंत तेंदू पत्ता जमा करणाऱ्या महिलांना चप्पल देण्यात येणार आहेत, यामुळे जंगलात त्या आरामात चालू शकतील.